फुलंब्री, (प्रतिनिधी) _: शहरात चोऱ्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी तीन घरी चोरी करत ०२ लाख १६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी फुलंब्री शहरातील सावता मंदिरालगत दुगत सचिन शेरकर यांच्या घराचे कुलूप तोडून रोख एक लाख रुपये, ४५ हजार रुपयांचे दीड तोळ्यांचे सोन्याचे गंठण, १६ हजार रुपयांची सोन्याची पोत असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
गुरुवारी सकाळी ही चोरी उघड झाल्यानंतर दुर्गा शेरकर यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुध्द फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या शिवाय चोरट्यांनी दोन लाख सोळा हजारांचा मुद्देमाल लंपास गिरजानगर येथील कीर्ती कृष्णा आढाव व त्यांचे भाडेकरी राजीव साळुंके यांच्या घराची कडीकोंडा तोडून २५ हजार रुपयांच्या लहाण बाळाच्या सोन्याच्या बाळ्या, ओम, अंगटी, ज्योती, चांदीचे दागिने तसेच ९३७५ नगदी १३ हजार असा एकुण ५३ हजार ३७५ रुपायांचा ऐवज लंपास केला.
या तिन्ही ठिकाणी मिळून चोरट्यांनी ०२ लाख १६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या चोऱ्यांचीही नोंद फुलंब्री पोलीसठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चाटे करत आहे.